कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचं महत्वाचं आवाहन; नाशकात बोलताना म्हणाले…

| Updated on: Mar 30, 2023 | 3:13 PM

Ajit Pawar On Corona Virus : राज्यात कोरोनाची रूग्ण संख्या वाढतेय. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी महत्वाचं आवाहन केलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

नाशिक : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज नाशिकमध्ये आहेत. तिथे त्यांचं भाषण झालं. यात त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस वाढत आहे. आपल्याला पुन्हा एकदा मास्क वापरण्याची गरज असल्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. आपल्याला कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्राचे महत्त्व लक्षात आले आहे. आम्ही आमच्या काळात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय क्षेत्रात लक्ष घातलं. आता नागरिकांसह सरकारनेही दक्ष राहण्याची गरज आहे, असं अजित पवार म्हणालेत. अलीकडच्या काळात आपली जीवन शैली बदलली आहे. केमिकल युक्त अन्नाचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होत आहे. सर्वांनी आरोग्यदायी जीवनशैली आणि सकस आहार याचा अवलंब करावा, असंही अजित पवार म्हणाले.

Published on: Mar 30, 2023 03:13 PM
राडा करणारी मुलं नशेडी, आपल्यावरही हल्ला चढवला; जलील यांचा खुलासा
मुंबईत पुन्हा कोरोनाचा धोका, फैलाव रोखण्यासाठी काय उपाययोजना?