इच्छामणी गणरायाला 56 भोगांचा नैवैद्य
चांदीच्या मूर्ती रुपात हा गणपती स्थानापन्न आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या बाप्पाला भाविकांनी अनोखा नैवद्य अर्पण केले आहे.
नाशिक : इगतपुरी शहरातील नवाबजार परिसरात असलेल्या नवसाला पावणाऱ्या इच्छामणी गणेश मंदिर येथील गणरायाला आज 56 भोगांचा नैवैद्य अर्पण करण्यात आला. चांदीच्या मूर्ती रुपात हा गणपती स्थानापन्न आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या बाप्पाला भाविकांनी अनोखा नैवद्य अर्पण केले आहे. शहरातील लोकांना दर्शन व्हावे या हेतूने पूर्ण इगतपुरी शहरातून गणरायाची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.