Nashik : चाडेगाव शिवारातील धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद, ग्रामस्थांनी घेतला सुटकेचा निःश्वास

| Updated on: Aug 24, 2022 | 10:54 AM

हा बिबट्या 10 वर्ष वयाचा असल्याचं समोर आलंय. वन विभागाने आतापर्यंत पकडलेला हा सर्वात मोठा बिबट्या असल्याचे देखील सांगितले जात आहे. बिबट्याच्या भीतीने लोक घराबाहेर येणं टाळत होते. 

नाशिक :  चाडेगाव शिवारात एक बिबट्या चांगलाच धुमाकूळ घालत होता. मात्र, बिबट्या काही वन विभागाच्या हाताला लागत नव्हता. शेवटी वन विभागाला हा बिबट्या पकडण्यात यश मिळालंय. नाशिकच्या (Nashik) चाडेगाव शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद करण्यास वन विभागाल यश मिळालंय. गेल्या अनेक दिवसांपासून चाडेगाव शिवारात या बिबट्याने (Leopard) धुमाकूळ घातला होता. हा बिबट्या 10 वर्ष वयाचा असल्याचं समोर आलंय. वन विभागाने आतापर्यंत पकडलेला हा सर्वात मोठा बिबट्या असल्याचे देखील सांगितले जात आहे. बिबट्याच्या भीतीने लोक रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर निघणे देखील टाळत होते. कधी शेतात तर कधी विहिरीच्याजवळ हा बिबट्या दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वन विभागाने (Forest Department) लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतलायं.

Published on: Aug 24, 2022 10:54 AM
Aarey Metro : आरे कारशेड प्रकरणावर आज सुनावणी, पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात सादर केले पुरावे
Assembly Session | ‘मुखी 50 खोके अन् बोके! विधीमंडळ परिसरात सत्ताधारी-विरोधक आमने-सामने