जोपर्यंत ‘हा’ नेता आमदार आणि मंत्री होत नाहीत, तोपर्यंत मी मालेगावात राहील; संजय राऊत यांचं वक्तव्य

| Updated on: Mar 25, 2023 | 12:39 PM

Sanjay Raut : भगवा आणि धनुष्यबाण कुणालाही पेलणार नाही. राज्याची जनता त्यांना धडा शिकवेन. मालेगाव आपलं आहे आणि आपलंच राहील, असं संजय राऊत म्हणालेत.

मालेगाव, नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी बोलताना मालेगावचा पुढचा आमदार कोण असणार? यावर भाष्य केलंय. जोपर्यंत अद्वय हिरे आमदार आणि मंत्री होत नाहीत, तोपर्यंत मी मालेगावात राहील, असं संजय राऊत म्हणालेत. मालेगावात खरी शिवसेना काय आहे ते दिसतंय. मालेगावात येऊन दाखवा, अशी धमकी देणाऱ्याच्या गावात येऊन 2 दिवसापासून राहतोय. चोर मालेगावात देखील राहत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी दादा भुसे यांना टोला लगावला आहे. ते नाशिकमधील मालेगावात बोलत होते.

Published on: Mar 25, 2023 12:37 PM
माफी मागणं त्यांच्या रक्तातच नाही ; रवींद्र धंगेकर यांची भाजपवर सडकून टीका
अमरावतीची सीटी बस सेवा मागील तब्बल 25 दिवसापासून बंद, प्रवाशांचे हाल