नाशिकमधून मनसैनिक मुंबईकडे रवाना; राज ठाकरे काय बोलणार? राज्याचं लक्ष
Raj Thackeray Sabha : मनसेचा मुंबईतील शिवतिर्थावर मेळावा होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी या मेळाव्याला नाशिकहून तसंच इगतपुरी तालुक्यातून मनसैनिक मुंबईला रवाना झाले आहेत. पाहा...
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवतीर्थवर मेळावा होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी या मेळाव्याला नाशिकहून तसंच इगतपुरी तालुक्यातून मनसैनिक मुंबईला रवाना झाले आहेत. तसेच शेकडो मनसैनिक रेल्वेने सुध्दा गेले असल्याची माहिती मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांनी दिली आहे. राज्यभरात गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यंदाही मनसेचा मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मेळावा होणार आहे. मुंबईला जाण्यापूर्वी मनसैनिकांनी नाशकात घोषणा दिल्या. त्यानंतर मनसैनिकांच्या वाहनाचा ताफा मुंबईला रवाना झाला.
Published on: Mar 22, 2023 03:52 PM