आंदोलनात शेतकऱ्याचा मृत्यू, एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण
नाशिक ते मुंबई पायी आलेल्या किसान सभेच्या लाँग मार्चमधील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.
मुंबई : नाशिक ते मुंबई पायी आलेल्या किसान सभेच्या लाँग मार्चमधील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. पुंडलिक जाधव असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून ते दिंडोरी तालुक्यातील माहुडी गावचे रहिवासी होते. जाधव यांच्या मृत्यूची वृत्त समजताच आंदोलक शेतकऱ्यांनी शहापूर येथील ग्रामीण रूग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. याबाबत स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, दुर्दैवाने एका शेतकऱ्याचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला. आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. शासनाच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदत दिली जाईल. तर ही घटना दुर्दैवी आहे. तर किसान सभेच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाली आहे. सरकार सगळ्याच मागण्यांबाबत सकारात्मक असून आता लाँग मार्च मागे घेण्यात येईल.
Published on: Mar 18, 2023 08:47 AM