आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज; तयारी सुरू

| Updated on: Apr 27, 2023 | 2:23 PM

Loksabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू; नाशकात घडामोडींना वेग.आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चैतन्य गायकवाड यांनी...

नाशिक : लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आलीये. सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तसंच प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेची तयारी सुरू झालीये. 18 हजार ईव्हीएम मशीन केंद्रीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिले आहेत. नाशिकच्या सय्यद पिंपरी इथल्या निवडणूक आयोगाच्या गोदामात ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत. 11 हजार 720 बॅलेट्स युनिट्स आणि 6 हजार 600 कंट्रोल युनिट्सचा समावेश यात समावेश आहे. पुढच्या महिन्यात निवडणूक आयोगाचे तंत्रज्ञ येऊन यंत्रांची तपासणी करणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सध्या तयारी करताना दिसत आहे.

Published on: Apr 27, 2023 02:23 PM
राऊत-सत्यपाल मलिक भेटीवर भाजप आक्रमक; कोणी केली देशद्रोह खटला दाखल करण्याची मागणी
सत्यपाल मलिक यांच्या भेटी मागचं कारण काय? संजय राऊत यांनी सांगितलं…