पक्षातील पडझड रोखण्यासाठी रश्मी ठाकरे मैदानात; नाशकात महिला मेळावा घेणार

| Updated on: Apr 13, 2023 | 9:21 AM

Rashmi Thackeray Nashik Daura : रश्मी ठाकरे पहिल्यांदाच नाशिकमध्ये महिला मेळावा घेणार; पाहा व्हीडिओ...

नाशिक : नाशिकमध्ये ठाकरे गटाची पडझड थांबवण्यासाठी आता रश्मी ठाकरे मैदानात उतरल्या आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाशिकमध्ये महिला त्या मेळावा घेणार आहेत. रश्मी ठाकरे पहिल्यांदाच नाशिकमध्ये महिला मेळावा घेणार असल्याने शिवसैनिकामध्ये उत्साह आहे. ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. नेते ,पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत असल्याने थेट रश्मी ठाकरे या आता मैदानात उतरल्या आहेत. संजय राऊत यांच्याकडे नाशिकची जबाबदारी असताना देखील पडझड सुरुच असल्याने आता रश्मी ठाकरे मैदानात उतरल्या आहेत.

Published on: Apr 13, 2023 09:21 AM
Anil Deshmukh : पंचनाम्यांचे अहवालानंतर तातडीनं मदत द्या; नाही तर… ; माजी गृहमंत्र्यांचा सरकारला डोस
वाशिममध्ये आज भाजपचा संकल्प मेळावा, देवेंद्र फडणवीस-चंद्रशेखर बावनकुळे संबोधित करणार