शेतीच्या ‘या’ प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष; शरद पवार यांनी शेती प्रश्नाकडे लक्ष वेधलं

| Updated on: Apr 09, 2023 | 1:15 PM

नाशिकमधील देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांच्या मतदारसंघात आदिवासी आश्रम शाळा आणि महिला वसतीगृहाचं भूमिपूजन पार पडलं. या कार्यक्रमाला माजी मंत्री छगन भुजबळ, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि स्थानिक उपस्थित होते. तेव्हा शरद पवार यांनी शेतीच्या प्रश्नाकडे लोकांचं लक्ष वेधलं.

नाशिक : नाशिक तालुक्यातील देवरगावमध्ये आदिवासी आश्रम शाळा आणि महिला वसतीगृहाचा भूमिपूजन सोहळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी शेतीच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं.”आज ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांचा शेतीकडे दृष्टीकोन बघण्याचा वेगळा आहे. शेतीमालाला चांगली किंमत दिली पाहिजे. बि-बियाणे, पाणी दिलं पाहिजे. या कामाकडे सध्याचं सरकार दुर्लक्ष करत आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत. “आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते लोक निर्यातीला प्रोत्साहन देत नाहीत. आयातीला प्रोत्साहन देत आहेत, असं होता कामा नये. शेतकरी हिताचे धोरण न आखणाऱ्या लोकांना आपल्याला बाजूला करावं लागेल”, असं शरद पवार म्हणालेत.

Published on: Apr 09, 2023 01:15 PM
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ‘हे’ सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला गेलय; संजय राऊत
‘रामराज्य’ म्हणता आणि रावणासारखा कारभार करता; ठाकरे गटाच्या खासदाराचं शिवसेनेवर टीकास्त्र