बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू, नाशिकच्या निफाडमधील घटना
बिबट्याच्या हल्ल्यात शेत मजुराच्या सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील ही घटना आहे. पाहा व्हीडिओ...
निफाड, नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात शेत मजुराच्या सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील ही घटना आहे. रोहन हिरामण ठाकरे असं बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सात वर्षाच्या चिमुकल्याचं नाव आहे. आई-वडिलांसमोर मक्याच्या शेतात ओढून नेत बिबट्याने या चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे नरभक्षक बिबट्याची म्हाळसाकोरे गावाच्या परिसरात दहशत पाहायला मिळत आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
Published on: Jan 30, 2023 09:13 AM