संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर; शिंदे गटाविरुद्ध काय रणनीती आखणार याकडे लक्ष
शिवसेना ठाकरेगटाचे नेते संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. ते सध्या नाशकात आहेत. पाहा व्हीडिओ...
नाशिक : शिवसेना ठाकरेगटाचे नेते संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. ते आज दुपारी नाशिकसाठी रवाना होतील. ठाकरेगटाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. येत्या काळात शिंदे गटाला ठक्कर देण्यासाठी काय करता येईल, यासाठी ते रणनीती आखण्याची शक्यता आहे. शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागातीलही आढावा संजय राऊत घेणार आहेत. शिवाय पक्षवाढीसाठी काय करता येईल, याकडेही त्यांचं लक्ष असेल. शिवाय पक्षातील नेत्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांचे प्रश्ना जाणून घेणार असल्याची माहिती आहे.
Published on: Feb 14, 2023 10:01 AM