मालेगावात उद्धव ठाकरे यांची सभा अन् दुसरीकडे पक्षातील महिला पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार

| Updated on: Mar 26, 2023 | 9:31 AM

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज नाशिकमधील मालेगावमध्ये सभा होत आहे. या सभेच्या आधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. महिला पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पाहा व्हीडिओ...

मालेगाव, नाशिक : उद्धव ठाकरे यांची आज नाशिकमधील मालेगावमध्ये सभा होतेय. या सभेच्या आधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. एकीकडे उद्धव ठाकरे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दुसरीकडे ठाकरे गटातील महिला आघाडीच्या पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे. 15 ते 20 महिला आघाडीच्या पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकेर आणि खासदार संजय राऊत नाशिकमध्ये असताना ही मोठी घडामोड होतेय.

Published on: Mar 26, 2023 09:30 AM
उर्दू बॅनरवरून शिंदे-फडणवीस यांची टीका; ‘आता अली जनाब झाले’
Video : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज नांदेड दौऱ्यावर, सभाही घेणार