आज दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक
गणेश दर्शनप्रसंगी कालच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी पक्षाची दिल्लीत बैठक होणार असल्याचे सांगितले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची निवडणूक होत असून त्यासंदर्भात आज दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. या बैठकीत अध्यक्ष पदाबाबत चर्चा होऊन निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या बैठकीसाठी राज्यातून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते दिल्लीत दाखल झाले आहे. राज्यातील वरिष्ठ नेते दिल्लीत दाखल झाल्याने कोण कोणत्या विषयाव चर्चा होणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पदावर विराजमान कोण होणार तेही याच बैठकीत स्पष्ट होईल असंही सांगण्यात येत आहे. गणेश दर्शनप्रसंगी कालच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी पक्षाची दिल्लीत बैठक होणार असल्याचे सांगितले होते.
Published on: Sep 10, 2022 03:19 PM