राज ठाकरे यांनी पांढऱ्या कागदावर कोणाला आणत दोनच शब्दात टोमणा मारला?

| Updated on: May 05, 2023 | 1:10 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

पुणे : गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चलबिचल दिसत आहे. त्यातच विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अजित पवार हे भाजपच्या वाटेवनर असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर त्यांचे भावी मुख्यमंत्री असेही पोस्टर्स लागले. तर आता त्यांच्यामुळेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यावर आता अनेक जण विश्लेषण करत आहे. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील हात साफ केला आहे. राज ठाकरे यांनी पुण्यात चक्क अजित पवार यांचे व्यंगचित्र काढत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी त्यांनी व्यंगचित्र काढत अजित पवार यांच्या कायमचा शब्द उच्चारला… तो म्हणजे गप्प बसा रे… यावरूनच त्यांना अजित पवार यांचे व्यंगचित्र काढायचे होते हे समोर आलं.

Published on: May 05, 2023 01:10 PM
राऊतांची नरमाईची भूमिका?; नव्या अध्यक्षनिवडीवर भाष्य करण्याचे टाळले? म्हणाले…
मुंबईत NCP कार्यालयाबाहेर आज दिवाळी, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष, शरद पवार, शरद पवार