छोट्या पक्षांवरून जयंत पाटलांचा भाजपवर निशाना, म्हणाले, ‘हा’ तर एक कलमी कार्यक्रम
महाराष्ट्रातल्या निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे. हे वर्ष संपेस्तोवर शिंदे गटाचं नामोनिशाणही राहणार नाही. येत्या निवडणूका भाजप एकटाच लढेल
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकाचा फॉर्म्युला सांगत शिंदे-फडणवीस एकत्र लढणार असे सांगितले. मात्र हे सांगत असतानाच त्यांनी शिंदे गटाला 48 जागा तर भाजप 240 जागा असे गणित स्पष्ट केलं. त्यानंतर एकच राजकीय खळबळ उडाली. यावर राष्ट्रवादीचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्रातल्या निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे. हे वर्ष संपेस्तोवर शिंदे गटाचं नामोनिशाणही राहणार नाही. येत्या निवडणूका भाजप एकटाच लढेल. तर स्थानिक पक्षांना संपवण्याचं काम भाजपाकडून सातत्याने होतं आहे. मित्र असो किंवा शत्रू त्यांना फोडणं, त्यांचे नामोहरम करणं हाच भाजपचा एक कलमी कार्यक्रम असतो असंही जयंत पाटील म्हणाले
Published on: Mar 18, 2023 01:19 PM