फडणवीस यांना शरद पवार यांनी पुन्हा डिवचलं, ‘माझी गुगली कळलीच नाही, ती फक्त गोलंदाजालाच…’
याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील शिंदे सरकारवर टीका केली. तसेच शिंदे सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. यावरूनही त्यांनी टीका केली. त्याचवेळी पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेसाठी काय करू शकतात हे जगासमोर आणण्यासाठी आपण खेळ खेळल्याचे त्यांनी सांगितलं.
मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा अपघात झाल्याने 25 प्रवाशांचा नाहक बळी गेला. त्यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरक टीकांचा भडीमार सुरू केला आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील शिंदे सरकारवर टीका केली. तसेच शिंदे सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. यावरूनही त्यांनी टीका केली. त्याचवेळी पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेसाठी काय करू शकतात हे जगासमोर आणण्यासाठी आपण खेळ खेळल्याचे त्यांनी सांगितलं. तर त्यांनी टाकलेल्या राजकीय ‘गुगली’मध्ये ते अडकले आणि त्यांची विकेट गेली असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला. त्यावर फडणवीस यांनी पलटवार करताना माझी नाही तर तुमच्या पुतण्याची विकेट गेली. तर हे फक्त अर्धसत्य असल्याचा खुलासा त्यांनी केला होता. त्यानंतर पवार यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांना डिवचताना माझी गुगली फडणवीस यांना कळलीच नाही. माझ्या गुगलीवर ते आऊट झाले. त्यांना गुगली टाकलेली कसे कळणार? ते फक्त बॉलरला माहित असते. तर ते म्हणतात तसे खरं असेल तर शपथविधीचा उद्योग का केला असा सवाल ही पवार यांनी केला आहे.