Special Report | कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर पवार कोणती घेणार भूमिका? पुनर्विचार शक्य की आपल्या मतावर ठाम?

| Updated on: May 03, 2023 | 7:33 AM

अजित पवार, सुप्रिया सुळे आणि छगन भुजबळ यांनी वाय बी सेंटर जात कार्यकर्त्यांची समजूत घालत शरद पवार, 2-3 दिवसांत पुनर्विचार करतील असं सांगितलं.

मुंबई : काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला. तसेच आपण अध्यक्षपदाचा राजीनामा (Resignation) देत असल्याचे घोषीत केलं. अख्या राष्ट्रवादीलाच या निर्णयाचा धक्का बसला आहे. याच्या आधीच पवारांनी पक्षात भाकरी फिरवण्याबद्दल वक्तव्य केलं होतं. पण ती भाकरी ही अशी असेल हे कोणत्याचं नेत्याला किंवा कार्यकर्त्याला वाटलं नव्हतं. तर अनेक नेत्यांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. तर वाय बी चव्हाण सेंटर (YB Chavan Center) बाहेरच कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. त्यानंतर यावर आता खलबत सुरू झाली. अजित पवार, सुप्रिया सुळे आणि छगन भुजबळ यांनी वाय बी सेंटर जात कार्यकर्त्यांची समजूत घालत शरद पवार, 2-3 दिवसांत पुनर्विचार करतील असं सांगितलं. त्यामुळे शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपला धक्कातंत्र अस्त्र बाहेर काढलं की काय अशीच चर्चा रंगू लागली आहे. पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

Published on: May 03, 2023 07:33 AM
Special Report | शरद पवारांचा निर्णय!; नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? सुप्रिया सुळे की अजित पवार?
Special Report | साडे ४ तासांचा ‘पवार’प्ले! पवारप्ले संपला? की नवा सुरु झाला?