भुजबळ यांनी फोन वादावर पडदा टाकला? काय केलं वक्तव्य? अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात वाद…?
अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात मतभेद असल्याचे बोलले जाऊ लागले. यावरून अजित पवार यांनी आपले मौन सोडले आणि याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांचीही ईडी चौकशी झाली.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची ईडीने (ED News) चौकशी केली. त्यानंतर त्यांनी आपल्याला सगळ्याच नेत्यांचे फोन आले मात्र अजित पावर यांचा फोन आला नाही असे सांगितल्याने एकच खळबळ उडाली. तर अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात मतभेद असल्याचे बोलले जाऊ लागले. यावरून अजित पवार यांनी आपले मौन सोडले आणि याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांचीही ईडी चौकशी झाली. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांची अनिल देशमुख यांची ईडी चौकशी झाली, तेव्हाही मी फोन केला नाही. मला वाटतं की, फोन करण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटलेलं बरं. मात्र या स्पष्टीकरणानंतरही काही प्रश्न उरतात का? त्यांच्यात खरेच मतभेद आहेत का यावरून जेष्ठ नेत छगन भुजबळ यांना छेडलं असता त्यांनी, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात कुठेही वाद नाही. तर जेव्हा जयंत पाटील जात होते चौकशीला त्यावेळी आधी प्रतिक्रिया मीच दिली होती. त्यामुळे फोनचा काही प्रश्न नाही. आणि यावर आता अजित पवार यांनी सांगितलं आहे. पण त्यांचे काही कामं असतील त्यामुळं केला नसेल फोन. पण आम्ही सगळे बरोबर आहोत.