पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा खरा ठरणार का? राष्ट्रवादीचा नेत्याचा मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘अजितदादांना मुख्यमंत्री…’
अजित पवार यांनी बंडखोरी करत पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. यावरून अजित पवार हे भावी मुख्यमंत्री होतील तर सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपच बाजूस करेल अशी चर्चा होत आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीसह राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. अजित पवार यांनी बंडखोरी करत पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. यावरून अजित पवार हे भावी मुख्यमंत्री होतील तर सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपच बाजूस करेल अशी चर्चा होत आहे. याचदरम्यान माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपद अजित पवारांना मिळेल असा दावा केला आहे. यावरून शिंदे गटासह भाजपमध्ये चुळबूळ सुरू झाली आहे. यावरूनच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आपले मत मांडले आहे. त्यांनी यावेळी, आमच्याच काय तर महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांच्या भावना याच आहेत की अजितदादांनी या राज्याचे नेतृत्व करावं. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी नेतृत्व करावं. परंतु मुख्यमंत्री होण्यासाठी 144 चा आकडा लागतो, इतके राजकीय समज सर्वांनी यांना आहे. तर आम्ही आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणून अजितदादांना या राज्याचा मुख्यमंत्री नक्कीच करू असा विश्वास त्यांनी दाखवला आहे.