छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीमागे पीएफआयचा हात? भाजप खासदारच्या वक्तव्याने चर्चा
Anil Bonde on Chhatrapati Sambhajinagar Riots : छत्रपती संभाजीनगरची दंगल आणि नवा संशय; भाजप खासदाराच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
नवी दिल्ली : भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीवर प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या या घटनेमागे पीएफआईचा हात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अजितदादा जरा धीर धरा नक्की या घटनेची चौकशी होईल. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्यानेच विरोधक आरोप करत आहेत. औरंगाबादची घटनाही मुस्लिम समाजातील दोन गटातील भांडणं त्यात हिंदूंचा काही संबंध नाही, असं अनिल बोंडे म्हणाले आहेत. अनिल बोंडे देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात पत्रही लिहिणार आहेत. ते नवी दिल्लीत टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
Published on: Apr 04, 2023 08:23 AM