राज्यातील सत्तासंघर्षातील सुनावणीबाबत आजचा दिवस अत्यंत महत्वाचा; सुनावणी पूर्ण होणार?

| Updated on: Mar 15, 2023 | 9:54 AM

Maharashtra Political Crisis : अवघ्या देशाचं लक्ष राजधानी दिल्लीकडे आहे. कारण राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होतेय. आजच्या सुनावणीत काय होतं? हे पाहणं महत्वाचं असेल. पाहा व्हीडिओ...

नवी दिल्ली : अवघ्या देशाचं लक्ष राजधानी दिल्लीकडे आहे. कारण राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होतेय. सत्तासंघर्षावरील सुनावणी आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. या सुनावणीत नेमकं काय होणार? याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. या सगळ्या प्रकरणावर आज निकाल येण्याची शक्यता आहे. काल या सगळ्यावर युक्तीवाद झाला. आता आज 2 दिवस युक्तिवाद होणार आहे. या 2 दिवसातील आज आणि उद्या दुपारपर्यंत शिंदे गट युक्तिवाद करणार आहे. उद्या दुपारनंतर ठाकरे गट अंतिम युक्तिवाद करणार आहे. त्यामुळे सत्तासंघर्ष बाबत आजच निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होतं? हे पाहणं महत्वाचं असेल. आजच निकाल लागतो की हा निकाल राखून ठेवला जातो, याकडेच आता राज्याचं लक्ष लागलं आहे.

Published on: Mar 15, 2023 09:54 AM
जुन्या पेन्शनबाबत त्रिसदस्यीय समितीची स्थापना, तीन महिन्यात अहवाल
हसन मुश्रीफ पुन्हा ईडीच्या रडावर; आज पुन्हा चौकशी