ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांची कन्येचे व्हीडिओ प्रसारित करण्यावर बंदी

| Updated on: Apr 20, 2023 | 2:02 PM

Aaradhya Bachchan : ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांची कन्या आराध्या बच्चनचे व्हीडिओ प्रसारित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पाहा व्हीडिओ...

नवी दिल्ली : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची कन्या आराध्या बच्चनच्या याचिकेबाबत दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. दिल्ली हायकोर्टाने गुगलसह यूट्युब चॅनेल्सला समन्स जाहीर केला. अकरा वर्षीय आराध्या बच्चनच्या प्रकृती विषयक दोन यूट्यूब चैनल आणि एका वेबसाईटने खोटी बातमी दिली होती. बच्चन कुटुंबियांकडून दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाची न्यायाधीश सी हरीशंकर यांच्या समोर सुनावणी झाली. आराध्या बच्चन बाबत यापुढे कोणतेही व्हीडिओ प्रसारित करण्यावर आता बंदी घालण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत.

Published on: Apr 20, 2023 02:02 PM
फरारी अमृतपाल सिंगच्या पत्नीचा डाव फसला; लंडनला जाताना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हृदय पिळवटून टाकणारी बातमी; कोल्हापुरात दोन अर्भकांचे कुत्र्यांनी तोडले लचके