भावना गवळी यांनी घेतली अमित शहा यांची भेट; उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाल्या…
Bhavana Gavali Meets Amit Shah : खासदार भावना गवळी आणि अमित शहा यांच्यात भेट झाली. या भेटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. पाहा ते काय म्हणालेत...
नवी दिल्ली : खासदार भावना गवळी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतलीय. ठाकरेगटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या भेटीनंतर शिवसेना खासदार अमित शाह यांची भेट घेतली आहे. रोशनी शिंदे हल्ल्याप्रकरणी चतुर्वेदी यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. अमित शाह यांची भेट घेऊन भावना गवळी यांनी प्रियांका चतुर्वेदी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी माध्यमांना या भेटीलिषय़ी माहिती दिली आहे. “आम्ही अमित शहा यांना पत्र दिलं आहे. इतर वेळी अन्याय झाला त्यावेळेला उद्धव ठाकरे कुठे होते? ठाण्यात उद्धव ठाकरेंना जायचा यांना अधिकार नाही”, असं भावना गवळी म्हणाल्या आहेत. मोर्चावर भावना गवळी यांनी टीका केली आहे. राजकीय फायद्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत, असं म्हणत भावना गवळी यांनी ठाकरेगटावर टीका केली आहे.
Published on: Apr 06, 2023 03:38 PM