चंद्रशेखर बावनकुळे, उमेदवारी अन् भ्रष्टाचाराचे आरोप; संजय राऊत नेमकं काय-काय बोलले?
Sanjay Raut on Chandrashekhar Bawankule : शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
नवी दिल्ली : शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे मागच्या निवडणुकीत तुमचं तिकीट का कापलं? तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला तिकिट का दिलं नाही? याचा विचार करा. तुम्ही वीज खात्यात नेमकं काय केलं होतं? बावनकुळे यांनी केलेल्या अफरातफरीची दिल्लीपर्यंत माहिती गेली. त्यामुळे त्यांना तिकीट दिलं गेलं नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत राजधानी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत होते. तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे.
Published on: Apr 05, 2023 10:27 AM