फडणवीस भिजलेलं काडतूस, सरकारमध्ये सगळेच झुके!; संजय राऊत यांचं टीकास्त्र

| Updated on: Apr 05, 2023 | 10:52 AM

Sanjay Raut on Devendra Fadnavis : तुम्ही गृहमंत्री झाल्याची अडचण महाराष्ट्राला आहे. तुम्ही गृहमंत्री झाल्यानंतर मंत्रालयात तीन लोकांनी आत्महत्या केल्या, असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस भिजलेलं काडतूस आहेत. सरकारमध्ये सगळेच झुके आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे. आम्ही कुठं बोललो की, तुम्ही झुका म्हणून… पण हे सगळे झुके आहेत. डॉ. मिंधे यांच्या टोळीने एका आमच्या महिला पदाधिकाऱ्यावर हल्ला केला. त्यांना भेटीसाठी उद्धव ठाकरे गेले होते. त्या महिलेवर हल्ला झाला. या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने नपुसंक म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी सौम्य शब्दात टीका केली. फडतूस म्हटलं. त्यात काय चुकीचं आहे? फडणवीस भिजलेली काडतूस आहेत. ईडी सीबीआय बाजूला ठेवून या म्हणावं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Published on: Apr 05, 2023 10:52 AM
हसन मुश्रीफांच्या अडचणीत वाढ; निकटवर्तीय चंद्रकांत गायकवाड यांना ED चा समन्स, आज होणार चौकशी
हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाआड ठाकरेंवर नवनीत राणा निशाना साधणार?