राहुल कुल यांच्या दबावामुळे कलम 144 लावलं, पण ते झुगारून शेतकरी सभेला आले- संजय राऊत

| Updated on: Apr 27, 2023 | 10:46 AM

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची काल दौंडमधील वरवंडमध्ये सभा झाली. यावर आज राऊतांनी भाष्य केलंय. राहुल कुल यांच्यावर निशाणा साधलाय. पाहा व्हीडिओ...

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची काल दौंडमधील वरवंडमध्ये सभा झाला. कालच्या दौंडमधील या सभेवर संजय राऊत यांनी भाष्य केलंय. “काल मी दौंड मध्ये सभा घेतली. तिथं 144 कलम लावलं गेलं. विद्यमान कारखान्याचे चेअरमन, आमदार राहुल कुल यांच्या दबावामुळे कलम 144 लावलं गेलं. पण ते झुगारून लोक सभेला आले. कालच्या सभेला हजारो शेतकरी उपस्थित होते , असं संजय राऊत म्हणालेत. सध्या भ्रष्टाचारावर एकतर्फी कारवाया होत आहेत. पाटसचा साखर कारखान्याचे 42 हजार सभासद आहेत. हा काय नवाज शरीफचा आहे काय? त्यात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे आम्ही बोलणारच, असंही राऊत म्हणालेत.

Published on: Apr 27, 2023 10:26 AM
राज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यांना गारपिटीचा तर कोठे जारी केला ऑरेंज अलर्ट?
आम्हाला मतदान करा, अन्यथा…, अमित शाह कर्नाटकातील जनतेला धमकी देताहेत; संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य