आधी पक्ष मग चिन्ह अन् आता संसदेतील शिवसेनेचं कार्यालयही शिंदेगटाच्या ताब्यात
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेगटाला मिळालं. त्यानंतर आता शिंदेगटासाठी महत्वाची बातमी आहे. पाहा राजधानी दिल्लीत काय घडतंय...
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेगटाला मिळालं. त्यानंतर आता शिंदेगटासाठी महत्वाची बातमी आहे. राज्यात विधानभवनातील विधीमंडळ पक्षाचं कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेतल्यानंतर आता संसदेचं विधीमंडळ पक्षाचं कार्यालयदेखील त्यांनी ताब्यात घेतलं आहे. संसदेतील शिवसेनेचं कार्यालय मिळावं, यासाठी शिंदे गटाचे गटनेते राहुल शेवाळे यांनी केंद्रीय सचिवालयाला पत्र दिलं होतं. आता ते शिंदेगटाच्या ताब्यात आलं आहे.
Published on: Feb 21, 2023 12:45 PM