माफीच्या मुद्द्यावर राहुल गांधी म्हणाले, माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी…

| Updated on: Mar 25, 2023 | 1:44 PM

सूरत सत्र न्यायलयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. या सगळ्या घटनाक्रमावर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

नवी दिल्ली : काँग्रेस राहुल गांधी यांचं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतच्या वक्तव्याची चर्चा होत असतानाच राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा सावरकरांच्या नावाचा उल्लेख केला आहे. राहुल गांधी यांची लोकसभेची सदस्यता काल रद्द करण्यात आली. पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी त्यावर आपली बाजू मांडली. राहुल गांधी यांच्या माफीची मागणी केली जात आहे. त्यावर प्रश्न विचारला असता राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख केला. माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे आणि गांधी माफी मागत नाहीत… त्यामुळे मीही कदापि माफी मागणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

Published on: Mar 25, 2023 01:41 PM
खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांची पहिली पत्रकार परिषद; मोदी आणि अदानी संबंधांवर भाष्य म्हणाले…
सामनाचा अग्रलेख म्हणजे गांजा-चिलीम ओढणाऱ्याने लिहिलेला अग्रलेख; भाजपच्या नेत्याचं टीकास्त्र