खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांची पहिली पत्रकार परिषद; मोदी आणि अदानी संबंधांवर भाष्य म्हणाले…

| Updated on: Mar 25, 2023 | 1:25 PM

Rahul Gandhi on Disqualified : माझं निलंबन करून, मला धमकी देऊन मला गप्प बसवता येणार नाही, असं राहुल गांधी म्हणालेत. राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील आणखी महत्वाचे मुद्दे पाहा...

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायलयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. या सगळ्या घटनाक्रमाबाबात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. देशात लोकशाहीवर आक्रमण होत आहे. मी विचारलं होतं की 20 हजार कोटी कुणाचे? संसदेत मी पुरावे दिले, त्यानंतरचा सगळा घटनाक्रम लोकांच्या समोर आहे, असं राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अदानी यांचं नातं जुनं आहे. त्यावर सत्ताधारी बोलत नाहीत, असंही राहुल गांधी म्हणालेत.

Published on: Mar 25, 2023 01:19 PM
राहुल गांधी माफा मागा म्हणणाऱ्या नेत्यालाच पटोलेंच थेट उत्तर, म्हणाले…
माफीच्या मुद्द्यावर राहुल गांधी म्हणाले, माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी…