संजय राऊत यांनी लिहिलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय कारण?

| Updated on: Apr 04, 2023 | 11:23 AM

Sanjay Raut Latter to Dvendra Fadnavis : खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे आणि कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. पाहा...

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्राचे कर्तबगार, कर्तव्य तत्पर गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी केलेली विनंती. बाजार बुणगे सरकारात आहेत.आपल्या सोबत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई कधी करणारं?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. याआधीही मी फडणवीसांना पत्र पाठवलं आहे. भीमा पाठस कारखान्यासंदर्भात पत्र पाठवलं आहे. दादा भूसे यांच्या विरोधात देखील पुरावे दिले आहेत. त्यांच्या कार्यालयाला पुरावे पाठवले आहेत, त्यामुळे आता कारवाई व्हावी, अशी अपेक्षा आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Published on: Apr 04, 2023 11:23 AM
राहुल गांधी कधीही सावरकर होऊ शकत नाहीत, सावरकर होण्यासाठी कुणातही औकात नाही- देवेंद्र फडणवीस
संजय राऊत यांची वक्तव्य, जागतिक व्यवस्था आणि समाधान; चंद्रकात पाटील यांची सविस्तर प्रतिक्रिया