आदित्य ठाकरे यांचा जागतिक पातळीवर ठसा; संजय राऊत यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

| Updated on: Mar 15, 2023 | 11:05 AM

Sanjay Raut on Aditya Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आदित्या ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. पाहा व्हीडिओ...

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आदित्या ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. “बाळासाहेब ठाकरे शक्तिशाली नेते होते आणि त्यांचे नातू आदित्य ठाकरे यांचा समावेश वर्ड इकॉनॉमिक फोरममध्ये समावेश होणं हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने गौरव आहे. आदित्य एक मंत्री, नेता म्हणून जागतिक ठसा उमटवत आहेत, आदित्य हे उज्ज्वल राजकीय भविष्य आहे”, असं राऊत म्हणालेत. ठाकरे परिवार, सहकारी यांचे बाबतीत खोटे गुन्हे दाखल करणे ,संपत्तीचा विषय व्हिडिओ मॉंर्फिंगचा विषय, फक्त शिवसेना आणि ठाकरे परिवार यांना लक्ष करून राजकारण सुरू आहे, असंही राऊत म्हणालेत.

Published on: Mar 15, 2023 10:28 AM
मिठ्या मारा किंवा तुम्ही मुके घ्या, तो तुमचा प्रश्न, पण…; संजय राऊत यांची आक्रमक प्रतिक्रिया
जलील यांच्या विरोधात मोर्चाला परवानगी नाहीच; मनसे मात्र ठाम