नरेंद्र मोदी तेजस्वी सूर्य, दिवसाचा प्रकाश आणि रात्रीचं चांदणंही त्यांच्याचमुळे पण मग…; संजय राऊत यांचा भाजपला थेट सवाल

| Updated on: Apr 04, 2023 | 12:17 PM

Sanjay Raut on PM Narendra Modi : मोदी सूर्य-चंद्र-धुमकेतू-शीतल चांदणं...पण आमचा प्रश्न वॉशिंग मशिनवर!, असं संजय राऊत म्हणाले आहेत. पाहा...

नवी दिल्ली : ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांची उपरोधित स्तुती करताना भाजपला सवाल केलाय. नरेंद्र मोदी सूर्य, चंद्र आहे, धुमकेतू आहेत. मोदी हे तेजस्वी सूर्य आहेत. हा सगळा प्रकाश मोदींमुळेच पडलाय. एवढंच काय रात्रीचं शीतल चांदणंही त्यांच्यामुळेच आहे. पण आमचा यांच्या वॉशिंग मशिनवर प्रश्न आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. गौतम अदानी, नीरव मोदी या लोकांना कोण वाचवत आहे? का वाचवलं जात आहे?, असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे. ते राजधानी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

Published on: Apr 04, 2023 12:12 PM
संजय राऊत यांची वक्तव्य, जागतिक व्यवस्था आणि समाधान; चंद्रकात पाटील यांची सविस्तर प्रतिक्रिया
गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; गौतमी आता सिनेमात दिसणार