शिवसेना एकच! गद्दारांनी शिवसेनेवर दावा करणं हे विकृतीचं लक्षण- उद्धव ठाकरे

| Updated on: Feb 08, 2023 | 1:20 PM

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पाहा ते काय म्हणालेत...

नवी दिल्ली : शिवसेना एकच आहे. दुसरी शिवसेना मी मानत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेगटाला इशारा दिलाय. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. 16 आमदार अपात्र होण्याची दाट शक्यता आहे. शिवसैनिक आमच्यासोबत आहेत.जनता आमच्या पाठिशी आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की निकाल आमच्याच बाजूने लागेल, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच निवडणूक आयोगाने चिन्हावर निकाल द्यावा, असं मतही त्यांनी व्यक्त केलंय.

Published on: Feb 08, 2023 01:20 PM
तसं तर उद्योगपतीही पंतप्रधान होतील; उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य
एकनाथ शिंदे यांच्या सभेतून लोकं उठून गेले नाही तर…, शिंदे गटाच्या नेत्याचं स्पष्टीकरण