तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला? सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिपण्णी

| Updated on: Mar 15, 2023 | 12:30 PM

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर कोर्टात सध्या महत्वपूर्ण युक्तीवाद केला जात आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या सर्व प्रकरणावर महत्वपूर्ण टिपण्णी केली आहे. पाहा संपूर्ण व्हीडिओ...

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी महत्वपूर्ण टिपण्णी केलीय. “तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला?”, असा थेट सवाल सरन्यायाधिशांनी शिवसेनेला विचारला आहे. “तीन वर्ष तुम्ही आनंदाने नांदला एका कारणामुळे तुम्ही सरकार पाडलं. तीन वर्षात तुम्ही एकही पत्र लिहिलं नाही. आता एका आठवड्यात 6 पत्र कशी काय लिहिली?”, असंही चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर आज निर्णय येण्याची शक्यता आहे. कोर्टात सध्या महत्वपूर्ण युक्तीवाद केला जात आहे.

Published on: Mar 15, 2023 12:25 PM
आम्हाला मंत्री करा म्हणता अन् विधानसभेत गैरहजर राहता, काहीतरी वाटलं पाहिजे…; अजित पवार आक्रमक
आमदार खासदारांनी पेन्शन घेता कामा नये, कारण…; बच्चू कडू यांचं लोकप्रतिनिधींना उद्देशून महत्वाचं वक्तव्य