देशात समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता, सर्वोच्च न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली
देशात समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता, सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण याचिका फेटाळली...
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने देशात समान नागरी कायदा लागण्याची शक्यता आहे. समितीला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. देशात समान नागरी कायदा (Court Uniform Civil Law) लागू होणार का? असा सवाल आता आणखी जास्त चर्चेत आहे. कारण समान नागरी कायद्याबाबत करण्यात आलेलं परीक्षण योग्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. कलम 162 अंतर्गत समिती स्थापनेचा अधिकार राज्यांना असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) व्यक्त केलंय. परीक्षण न्यायालयाकडून मान्य झाल्याने समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता आता बळावली आहे.