उष्माघात मृत्युवर आव्हाड यांनी सरकारला डिवचलं; म्हणाले, इकते कमी मृत्यू हे शक्यच नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मनातील शंका उपस्थित करताना शिंद-फडणवीस सरकारवर हल्ला चढवला आहे. याच्याआधी आव्हाड यांनी ट्विट करत सोहळ्यात झालेले मृत्यू हे उष्माघातामुळे कि चेंगराचेंगरीमुळे झाले? असा प्रश्न उपस्थित केला आहे
ठाणे : नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 12 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. तर, शेकडो रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता या घटनेबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. तर या आकड्यावरूनही अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. यावरूनच म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मनातील शंका उपस्थित करताना शिंद-फडणवीस सरकारवर हल्ला चढवला आहे. याच्याआधी आव्हाड यांनी ट्विट करत सोहळ्यात झालेले मृत्यू हे उष्माघातामुळे कि चेंगराचेंगरीमुळे झाले? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर यावेळी त्यांनी, पुरस्कार सोहळ्यात 12 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. हा आकडा कमी आहे. सत्य आकडा हा लपवला जात आहे. तर फक्त 12 मृत्यू तर शक्यच नाही असेही त्यांनी म्हटलं आहे.
Published on: Apr 19, 2023 02:52 PM