महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एकाचा मृत्यू

| Updated on: Apr 17, 2023 | 11:58 AM

Maharashtra Bhushan Award ceremony 2022 : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 12 श्रीसदस्यांचा मृत्यू; 23 जणांवर उपचार सुरू. पाहा संपूर्ण व्हीडिओ...

मुंबई : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृतांचा आकडा वाढला आहे. आणखी एका श्रीसेवकचा मृत्यू झाला आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम दुपारी पार पडला. या सोहळ्यात उष्मघातामुळे अनेक श्री सदस्यांना त्रास झाला आहे. या सोहळ्यात उष्माघातामुळे 12 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. तर 23 जणांवर नवी मुंबईच्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. आता आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या जखमींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आणि विचारपूस केली.

Published on: Apr 17, 2023 11:58 AM
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील दुर्दैवी घटनेवर संजय राऊत स्पष्टच म्हणाले, ‘श्री सदस्यांचा विचार न करता…’
मुलांचं शिक्षण अन् घरखर्च भागवायचा कसा? शेतकरी हतबल, कुणी केली फसवणूक