Sanjana Ghadi : नवनीत राणा C Grade फिल्ममध्ये काम करणारी अभिनेत्री, संजना घाडींचा आरोप
लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेले मातोश्री एक मंदीर आहे आणि तिथेच तु्म्ही हा पराक्रम केला. शिवसेनेवर आरोप करणाऱ्या राणा यांना घाडी यांनी दंगलीच्या दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीमध्येच नमाज पाडायला लावले होते, त्या प्रसंगाचीही आठवण करुन दिली. त्यामुळे C Grade फिल्ममध्ये काम करणारी अभिनेत्रीने अशाप्रकारे टीका करणे हे अशोभनीय असल्याचे संजना घाडी यांनी सांगितले आहे.
मुंबई : (Navneet Rana) खा. नवनीत राणा यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत टोकाचे आरोप केले. यावरुन आता शिवसेनेकडून त्यांच्यावर आरोप सुरु झाले आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या (Sanjana Ghadi) संजना घाडी यांनी तर नवनीत राणांचा इतिहासच सांगितला. जी अभिनेत्री C Grade फिल्ममध्ये काम करीत होती त्यांनी अशाप्रकारे आरोप करणे चुकीचे आहे. (MNS Party) मनसेने मशिदीवरील भोंग्याच्या अनुशंगाने मशिदीसमोर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचे आव्हान केले होते. यांना तर मशिदी आणि मातोश्री यामधलाही फरक कळला नाही. लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेले मातोश्री एक मंदीर आहे आणि तिथेच तु्म्ही हा पराक्रम केला. शिवसेनेवर आरोप करणाऱ्या राणा यांना घाडी यांनी दंगलीच्या दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीमध्येच नमाज पाडायला लावले होते, त्या प्रसंगाचीही आठवण करुन दिली. त्यामुळे C Grade फिल्ममध्ये काम करणारी अभिनेत्रीने अशाप्रकारे टीका करणे हे अशोभनीय असल्याचे संजना घाडी यांनी सांगितले आहे.