उद्धव ठाकरे बांधावर गेले पण शेतात नाही, नवनीत राणांची खोचक टीका, पाहा Video

| Updated on: Oct 24, 2022 | 3:16 PM

मी त्यांना शेतात पाहिलं नाही. तुम्ही पाहिलं का? शेताच्या बाहेरून त्यांनी पत्रकार परिषद घेतली, असा टोमणा नवनीत राणांनी लगावला.

स्वप्निल उमप, अमरावतीः राज्यभरातील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सध्या चहुबाजूंनी टीका होत आहे. उद्धव ठाकरे केवळ नाटक करतायत, असा निशाणा साधला जातोय. अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणांनीही (Navneet Rana) त्यांच्यावर तोंडसुख घेतलं. त्या म्हणाल्या, ‘ उद्धव ठाकरे बांधावर गेले पण शेतात नाही, तिथूनच पत्रकार परिषद घेतली…
नवनीत राणा पुढे म्हणाल्या, कोणत्या पिकाचं नुकसान झालं आणि कसं नुकसान झालं, ते उद्धव ठाकरेंनी पाहिलं नाही. त्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा. अडीच वर्ष काही केलं नाही पण बांधावरच्या नावानं पहिल्यांदा घरातून बाहेर निघाले, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं. मी त्यांना शेतात पाहिलं नाही. तुम्ही पाहिलं का? शेताच्या बाहेरून त्यांनी पत्रकार परिषद घेतली, असा टोमणा नवनीत राणांनी लगावला.

Published on: Oct 24, 2022 03:15 PM
राज्यातीस राजकारण आणि इतर बातम्यासंह पहा सुपरफास्ट 50 न्यूज
एकनाथ शिंदे यांची मानसिकता खराब, त्यांना सत्तेची गुर्मी!, नाना पटोले असं का म्हणाले?, पाहा…