Navneet Rana : नवनीत राणा थांबणारी नाही, जनहितासाठी लढणारी, तरीही धमकी पत्रानंतर भीती
मला सुरक्षा आहे. तरीही घरापर्यंत पत्र पोहचणं हे धक्का आहे. महिला म्हणून माझ्या कुटुंबाला धोका आहे. नवनीत राणा थांबणारी नाही लढणारी आहे. मनात भीती निर्माण होतेच, असंही त्यांनी सांगितलं.
मुंबई : खासदार नवनीत राणा यांना धमकीचं पत्र आलं. त्या पत्रात म्हटलंय, अल्ला को दुवाँ करुंगा की आपकी जान को कोई खतरा ना हो. तुम्ही माझी बदली करून आणली. राजस्थानवरून काही लोकं आले. तुमच्या घराची रेकी करून गेले, अशी माहिती राणा यांनी दिली. त्यावर त्या म्हणाल्या, एकच कनेक्शन मला दिसते. कोल्हे परिवारासाठी जो आवाज उठविला. त्यासोबत कनेक्शन होऊ शकतो. चौकशी केल्यास कोल्हे यांच्या प्रकरणातील आरोपी सापडतील. माझा आवाज सामान्य लोकांचे प्रश्न उठवत राहील. धमकीच्या मागे कोल्हे प्रकरण असू शकतो. एनआयएमध्ये पोहचली. त्यानंतर चौकशी सुरू झाली. मला सुरक्षा आहे. तरीही घरापर्यंत पत्र पोहचणं हे धक्का आहे. महिला म्हणून माझ्या कुटुंबाला धोका आहे. नवनीत राणा थांबणारी नाही लढणारी आहे. मनात भीती निर्माण होतेच, असंही त्यांनी सांगितलं.
Published on: Jul 29, 2022 04:54 PM