जोशी बेडेकर कॉलेजमध्ये एनसीसी विद्यार्थ्यांना मारहाण, प्राचार्यांच्या निलंबनासाठी राष्ट्रवादी, ठाकरे गटाचं आंदोलन

| Updated on: Aug 04, 2023 | 12:56 PM

शहरातील नामांकित जोशी बेडेकर कॉलेजमध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड संतापाची लाट उसळली असून आता विविध राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत.

ठाणे, 4 ऑगस्ट 2023 | शहरातील नामांकित जोशी बेडेकर कॉलेज मध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड संतापाची लाट उसळली असून आता विविध राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. या घटनेविरोधात सर्व राजकीय पक्ष एकवटले असून आज सकाळपासून कॉलेजबाहेर आंदोलन सुरू आहे.सकाळपासूनच विविध राजकीय पक्ष कॉलेजबाहेर आंदोलन करत असून तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रवादी, शिंदे गट आणि ठाकरे गटातील युवासेनेचे कार्यकर्ते महाविद्यालयाच्या गेट समोर घोषणाबाजी करत आहेत. कॉलेजच्या प्राचार्यांवरही गुन्हा दाखल करा,अशी मागणी केली जात आहे.

Published on: Aug 04, 2023 12:56 PM
येवल्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर संकट, पिकावर अळीचा प्रादुर्भाव
नितीन देसाई यंदाही साकारणार होते ‘लालबागच्या राजा’च्या देखावा, बहूतांश काम पूर्ण…; यावर्षी काय होता मास्टर प्लान?