बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता भडकला; अमोल मिटकरी यांना म्हणाला, “तुम्ही मम म्हणणार का?”

| Updated on: Jul 07, 2023 | 9:55 AM

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. या फूटीनंतर राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संभ्रमावस्थेत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता बंडखोर आमदार अमोल मिटकरी यांच्यावर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला.

मुंबई: अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. या फूटीनंतर राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संभ्रमावस्थेत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता बंडखोर आमदार अमोल मिटकरी यांच्यावर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. राष्ट्रवादीची विचारधारा का सोडली असा सवाल त्याने मिटकरी यांना केला आहे. या कार्यकर्त्याच नाव शंकर शेजूळ असं आहे. त्याने अमोल मिटकरी यांना फोन करत दादा आता तुम्ही मम म्हणार का? असा सवाल केला आहे. ही ऑडिओ क्लिप आता चांगलीच व्हायरल झाली आहे. यावर अमोल मिटकरी यांनी काय प्रतिक्रिया दिली यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jul 07, 2023 09:55 AM
राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत स्पष्टच बोलले, “…शेवटी भावांचं नातं कायम”
उद्धव-राज ठकरे युती होणार का? नितेश राणे म्हणतात, “रश्मी ठाकरे यांना मान्य आहे का?”