18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ? अजित दादा गटाच्या आमदाराचाच सवाल
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 18 दिवस झाले तरी आरोपींना अटक झालेली नसून त्यावरून राज्यभरातील वातावरण अतिशय तापलेलं आहे. एकीकडे विरोधकांनी सरकारला धारेवर धरलेलं असतानाच आता महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारानेच सरकारला सवाल विचारत घरचा आहेर दिला
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 18 दिवस झाले तरी आरोपींना अटक झालेली नसून त्यावरून राज्यभरातील वातावरण अतिशय तापलेलं आहे. एकीकडे विरोधकांनी सरकारला धारेवर धरलेलं असतानाच आता महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारानेच सरकारला सवाल विचारत घरचा आहेर दिला आहे. 18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ? असा सवाल आमदार प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलंय असं म्हटलं जात आहे मग तरीही अजून खंडणीखोरांना अटक का झालेली नाही असा सवालही सोळंके यांनी विचारला आहे. वाल्मिक कराडची पोलीस प्रशासनात दहशत असल्याचा आरोपही सोळंके यांनी केला आहे. आरोपीला अटक करता येत नाही. खंडणी मागणाऱ्याला पकडता येत नाही, राजाश्रय असल्याशिवाय अशा गोष्टी होतात का असे म्हणत सोळंके यांनी हल्ला चढवला.