गावित यांच्या त्या वादग्रस्त विधानावर रुपाली ठोंबरे भडकल्या; म्हणाल्या, ‘बेताल, भान…, धिक्कार’
मंत्री विजयकुमार गावित यांच्या मासे खा या वक्तव्यावरून सध्या जोरदार टीका होताना दिसत आहे. तर त्यांच्या ऐश्वर्या राय यांच्यावरील टिपण्णीवरून विरोधकांसह भाजपच्या महिला नेत्या देखील भडकल्या आहेत.
मुंबई : 22 ऑगस्ट 2023 | भाजप नेते तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी ऐश्वर्या राय हिचे नाव घेत धक्कादायक विधान केलं होतं. त्यावर भाजप महिला नेत्या चित्रा वाघ, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह अनेक नेत्यांनी गावित यांचा खरपूस समाचार घेतला आहे. याच दरम्यान आता त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे यांनी टीका केली आहे. लोकप्रतिनिधी असलेल्या गावितांनी भान ठेऊन बोलावं असं त्यांनी म्हटलं आहे. ठोंबरे यांनी विजयकुमार गावित यांच्यावर ट्विट करून ही टीका केली आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींना भान असलंच पाहिजे असे म्हणताना, मासे खाऊन डोळे सुंदर होतात. पटवण्यात येतात. यापेक्षा आपल्या समाजातील माता-भगिनी सक्षम सुरक्षित कशा राहतील यावर बोलावं. तसं काम करावं. बेताल भान नसलेल्या लोकप्रतिनिधींचा धिक्कार असेही ठोंबरे यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे.