मविआत बिघाडी झालीय का? अजित पवारांनी राऊत यांच नाव ऐकताच वक्त केला राग; म्हणाले…
अजित पवार यांना विचारलं असता त्यांना राग अनावर झाल्याचे दिसून आले आहे. त्यावर त्यांनी पत्रकारांनी कोण संजय राऊत? असं प्रतिसवाल केला. त्यामुळे ते राऊत यांच्यावरून चांगलेच नाराज असल्याचे दिसत आहे
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार हे भाजपमध्ये जाणार यावर सतत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलत असतात. त्यावरून याच्याआधीच अजित पवार यांनी खुलासा केला आहे. यानंतर ही राऊत यांच्याकडून चर्चा केलीच जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना विचारलं असता त्यांना राग अनावर झाल्याचे दिसून आले आहे. त्यावर त्यांनी पत्रकारांनी कोण संजय राऊत? असं प्रतिसवाल केला. त्यामुळे ते राऊत यांच्यावरून चांगलेच नाराज असल्याचे दिसत आहे. तर मविआत बिघाडी झालीय का? असा ही सवाल आता अनेकांना पडला आहे. यादरम्यान, मी कुणाचं नाव घेतलं नाही, कोणी का म्हणून अंगाला लावून घ्यावं? असं म्हणत मी माझा पक्षाबद्दल बोलल्याचं पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे संजय राऊत आणि अजित पवार यांच्यातील वाद हा मिटण्याऐवजी वाढणार असेच दिसत आहे.
Published on: Apr 21, 2023 01:15 PM