जयंत पाटीलांच्या वक्तव्यावर पटोलेंचा टोला; ज्यांच्या जास्त जागा त्यांचा…

| Updated on: Apr 30, 2023 | 11:00 AM

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य करत खळबळ उडवून दिली. त्यांनी महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मागतच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून पोस्टर्स लागत आहे. कधी सुप्रिया सुळे, कधी जयंत पाटील तर आता अजित पवारांच्या नावाने राज्याभर भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लागत आहेत. त्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य करत खळबळ उडवून दिली. त्यांनी महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी भविष्यात पुढे येईल, असं म्हटलं. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टोला लगावला आहे. त्यांनी, ज्याच्या जागा जास्त असतील त्याचा मुख्यमंत्री होईल. तर आता यावर काँग्रेसला कोणतीही चर्चा करायची नाही असं पटोले म्हणालेत.

Published on: Apr 30, 2023 11:00 AM
साताऱ्यात 8 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक, कराडमध्ये मतदानाला सुरूवात
महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद अन् जयंत पाटलांचं वक्तव्य; सुजय विखे पाटील यांचं जोरदार टीकास्त्र