Special Report | शरद पवारांचा निर्णय!; नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? सुप्रिया सुळे की अजित पवार?

| Updated on: May 03, 2023 | 7:15 AM

पवारांनी राजीनामा दिल्यानंतर नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ते त्यांचे राजीनामे देत आहेत. त्यावर 2-3 दिवसांत शरद पवार निर्णय घेतील असे अजित पवारांनी सांगितलंय.

मुंबई : राज्याच्या राजकारणात कालचा 2 मे हा दिवस राजकीय वादळ आणणारा ठरला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरुन निवृत्त (Sharad Pawar Retirement matter) होण्याचा निर्णय जाहीर केला. आणि अनेकांना त्याचा धक्का बसला. तर अंजली दमानियांनी ट्विट करत परत ट्विस्ट आणला. तर काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी किती दिवस सोबत राहिल माहिती नाही, त्यांची भाजप सोबत बोलणी सुरु आहे, असा दावा केला होता. त्याच्यानंतर आता शरद पवार यांनी आपली राजीनामा दिला. त्यानंतर आता नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल? यावरुन चर्चा सुरु झाली. अर्थात राष्ट्रवादीचा अध्यक्ष पवार कुटुंबातलाच असेल की कुटुंबाबाहेरचा हेही पाहणं महत्वाचं असेल. सुप्रिया सुळे (Supriya Sule) शरद पवारांच्याच कन्या तर अजित पवार (Ajit Pawar) हे पुतणे आहेत. या दोघांपैकी एकाला कमान मिळेल की मग तिसराच चेहरा निवडण्यात येईल याचा निर्णय एक समिती घेणार आहे. निवड समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी.चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश असेल. तर पवारांनी राजीनामा दिल्यानंतर नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ते त्यांचे राजीनामे देत आहेत. त्यावर 2-3 दिवसांत शरद पवार निर्णय घेतील असे अजित पवारांनी सांगितलंय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता या राजीनाम्यानं काय समिकरण बदलतात हे पहावं लागणार आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट

 

Published on: May 03, 2023 07:15 AM
Sharad Pawar Resigns : शरद पवार निवृत्तीची घोषणा करताना नेमकं काय म्हणाले?
Special Report | साडे ४ तासांचा ‘पवार’प्ले! पवारप्ले संपला? की नवा सुरु झाला?