“पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज आहेत का?”, धनंजय मुंडे म्हणाले…
Dhananjay Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून एक विधान केलं. यावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून एक विधान केलं. मोदींना राजकारणातील वंशवाद संपवायचा असेल पण ते मला संपवू शकत नाहीत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यानंतर पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पंकजा मुंडे नाराज आहेत का? याची मला कल्पना नाही. माझ्यापेक्षा त्या स्वत: याविषयी बोलू अधिक बोलू शकतात. त्यांनी जर तसं जाहीर केलं तर पुढे बोलता येईल, असं धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणालेत.
Published on: Sep 28, 2022 12:54 PM