पुण्यातील व्यवसायिकांवर ईडीची धाड; छापेमारीचं कनेक्शन मुश्रीफ

| Updated on: Apr 03, 2023 | 10:50 AM

पुण्यातील 9 बड्या व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या व्यावसायिकांचे संबंध मुश्रीफ यांच्याशी असल्याचं बोललं जात आहे

पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोपांवरून गेल्या काही दिवसापासून ईडीची छापेमारी सुरू आहे. आप्पासाहेब नलावडे गैरव्यवहार प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर आरोप आहेत. त्यावरून कोल्हापूरसह पुण्यात याच्याआधी ईडीकडून छापेमारी करत झाडाझडती करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळ सकाळी पुण्याचे दरवाजे ठोठावले आहेत. पुण्यातील 9 बड्या व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या व्यावसायिकांचे संबंध मुश्रीफ यांच्याशी असल्याचं बोललं जात आहे. तर यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Published on: Apr 03, 2023 10:50 AM
शिक्षेविरोधात सुरत सत्र न्यायालयात राहुल गांधी करणार अपील
नाना पटोले वज्रमूठ सभेला गैरहजर का? संजय राऊत यांनी सविस्तर सांगितलं…