Jayant Patil : मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर

Jayant Patil : मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर

| Updated on: Mar 24, 2025 | 7:59 PM

Jayant Patil On Nagpur Violence : नागपूर राडा प्रकरणावरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सत्ताधारी पक्षाला चांगलंच धारेवर धरलं.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी नागपूर हिंसाचार घटनेवरून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं. यावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले की, नागपूरचा राडा हा पूर्वनियोजित होता असं जर सत्ताधारी पक्ष म्हणत असेल, तर मग तुम्ही काय हजामत करत होता का?  नागपूरचे लोक शांत स्वभावाचे आहेत. असं असूनही तिथे एवढा मोठा राडा कसा होतो?असे प्रश्न विचारत जयंत पाटील यांनी सरकारला चांगलच फैलावर धरलं.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राज्याला सावरण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी करायला हवं. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी तरी चुकीच्या गोष्टींचे उदात्तीकरण करू नये. नाहीतर दावोसमध्ये करार केलेले 15 लाख कोटी दुसरीकडे जातील असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

Published on: Mar 24, 2025 07:59 PM
आदित्य ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, एकनाथ शिंदे दालनात येताच…, काय घडलं बघाच?
Solapur Rain News : भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी